कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांची राजर्षी शाहू अध्यासनास सदिच्छा भेट

कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांची राजर्षी शाहू अध्यासनास सदिच्छा भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर येथील कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राजर्षी शाहू अध्यासन केंद्रास लोणेरे (रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.  कारभारी काळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थापक प्राचार्य डाॅ. जे. के. पवार यांनी त्यांचे शाल, शाहू ग्रंथ व शाहू प्रतिमा देऊन स्वागत केले. 

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्य व विचारांची माहिती देणारे मागील १३८ वर्षांमधील २१२ शाहू ग्रंथ या अध्यासनामध्ये उपलब्ध आहेत. राजर्षी शाहूंचे विचार व कार्य अध्यासनाद्वारे चांगल्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचत असल्याचे समाधान कुलगुरु प्रा. डॉ. कारभारी काळे यांनी व्यक्त केले. तसेच अध्यासनातील सर्व ग्रंथांचे डिजीटायझेशन करण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी अध्यासनाचे संचालक व अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे जनसंपर्क अधिकारी प्रा. डॉ. दिग्विजय पवार यांना केली.

यानंतर संभाजीनगर येथील प्रा. डॉ. प्रज्ञा काळे यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या शेती, उद्योग, शिक्षण, महिला सबलीकरण आदी क्षेत्रातील विविधांगी कार्याची माहिती डॉ. पवार यांच्याकडून घेतली.

यावेळी ओम इलेक्ट्रोटेकचे सीईओ ओंकार बुरांडे, अमित कुलकर्णी, प्राचार्य अवधूत पाटील आदी उपस्थित होते.