कोरे अभियांत्रिकीचे प्राध्यापक , विद्यार्थी यांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र

वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक आतिश चव्हाण, प्राध्यापक गौतम कांबळे व मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागाच्या विद्यार्थीनि ऋचा भिसे, निवेदिता यामी व नेत्रा पनवल यांना भारत सरकारचे "एक्वा अमोनिया एबसॉर्पशन रेफ्रिजरेशन सिस्टम सिमुलेशन सॉफ्टवेअर " या विषयावर कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. रेफ्रिजरेशन क्षेत्रात या सॉफ्टवेअरचा व या मॅन्युअलचा प्रभावी सिस्टीम डिझाईन साठी उपयोग होणार आहे
श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. बी . टी . साळोखे , डीन,डॉ. एस. एम. पिसे सर्व विभाग प्रमुख , प्राध्यापक, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.