कोल्हापुरात जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने मनोज जरांगेंचे अत्यंत उत्साहात स्वागत

कोल्हापुरात जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने मनोज जरांगेंचे अत्यंत उत्साहात स्वागत

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे-पाटील यांचे अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी मोठ्या जयघोषात त्यांचा सन्मान करून मराठा समाजाच्या लढ्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या स्वागत समारंभात जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मनोजदादांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने त्यांना स्मृतिचिन्ह व पुस्तके भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करत, समाजातील एकजूट आणि संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी सर्व उपस्थितांनी केला. या कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला पदाधिकारी व मराठा समाजातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा चारुशीला पाटील, जिल्हाध्यक्षा वनिता निंबाळकर, रंजना पाटील, , सुमन वागळे, रेवती पाटील,  त्वरिता पाटील,दीपा कोकाटे  स्मिता हातकर,अश्विनी पाटील यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.