राजा शिवाजी'च्या यशानंतर रितेश-जेनेलिया सुट्टीच्या मूडमध्ये; समुद्रकिनारी घालवला खास वेळ

राजा शिवाजी'च्या यशानंतर रितेश-जेनेलिया सुट्टीच्या मूडमध्ये; समुद्रकिनारी घालवला खास वेळ

मुंबई (प्रतिनिधी) : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा आपला फॅमिली टाइम एन्जॉय करताना दिसत आहे.नुकतंच कपलने आपल्या मुलांसह वॅकेशनमधील खास फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. सध्या त्यांची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

आपल्या बिझी शेड्यूलनंतर हे कपल क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे. नुकतंच जेनेलियाने आपल्या वॅकेशनचे सुंदर फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये अभिनेत्री पती रितेश, मुलं आणि काही मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे. दोघेही सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. जेनेलियाच्या लेटेस्ट पोस्टमध्ये क्यूट मोमेंट्स पाहायला मिळत आहे.

एका फोटोमध्ये जेनेलियाने गॉगल घातला आहे. जेनेलियाचा यात स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. कँडिड पोजमध्ये अभिनेत्रीचे मजेशीर एक्सप्रेशन फॅन्सना प्रचंड आवडले आहे.तसेच रितेश आणि जेनेलियाची मुलं समुद्राच्या किनाऱ्यावरील वाळूत खेळताना दिसत आहे. रितेश - जेनेलियाच्या मुलांच्या फोटोंनी सध्या युझरचं लक्ष वेधून घेतलं आहे.आणखी एका फोटोमध्ये रितेश - जेनेलिया आपल्या मित्रांसोबत पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. 

सर्वांनी एकत्र पूलमध्ये एन्जॉय केले असून, या कपलचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.फॅन्सने जेनेलियाने शेअर केलेल्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.