कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा संपन्न; विकास कामांना आणि निविदांना मंजुरी
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक समिती सभागृहात आज गुरुवार, (१० सप्टेंबर २०२६) रोजी बांधकाम समितीची महत्त्वाची सभा सभापती सारिका यशवंत नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

सभेची सुरुवात सचिव तथा कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांनी सभापती सारिका यशवंत नांदेकर आणि उपस्थित समिती सदस्यांच्या स्वागताने केली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.
सभेतील प्रमुख विषय व निर्णय
-
मागील कार्यवृत्त: दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या मागील सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात आले.
-
निविदा मंजुरी: ६० लाख ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या कामांच्या निविदांना मंजुरी देणे तसेच ७५ लाखांवरील कामांच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करून मंजुरीबाबत निर्णय घेण्यात आला.
-
अनामत रकमा परत करणे: महसुलात जमा करण्यात आलेल्या सुरक्षा अनामत ठेवीची रक्कम मागणीनुसार परत करण्याबाबत स्थायी समितीकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेस बांधकाम सभापती, समितीचे सर्व सदस्य, कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्ह्यातील सर्व उपअभियंता आणि संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन ही सभा पार पडली.




