क्रिडाई कोल्हापूर तर्फे बालाजी गार्डन येथे रक्तदान शिबीर संपन्न

क्रिडाई कोल्हापूर तर्फे बालाजी गार्डन येथे रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर /प्रतिनिधी : क्रिडाई कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिक शिखर संघटना असून बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याबरोबर अनेक सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेत आलेली आहे.

सालाबादप्रमाणे यंदाही सर 15 सप्टेंबर हा दिवस सर मोक्षगुडंम विश्वेश्वरैय्या यांचा जन्म दिन अभियंता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.या दिनाचे औचित्य साधून क्रिडाई कोल्हापूर तर्फे रक्तदान शिबीर बालाजी गार्डन येथे आज  शुक्रवार दि. 11/09/2026 रोजी आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरवात क्रिडाई महाराष्ट्राचे चे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांच्या हस्ते व क्रिडाई कोल्हापूर अध्यक्ष के.पी.खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड, सहखजानिस सागर नालंग, प्रदीप भारमल, संदिप पोवार, अमोल देशपांडे, संग्राम दळवी, सुनिल चिले, डॉ डी.वाय पाटील ब्लड बँक चे  डॉ.डफळे, क्रिडाई कोल्हापूर युथ विंग चे समन्वयक प्रणव क्षीरसागर, सहसमन्वयक प्रतिक होसमनी, सभासद पवन जामदार,संतोष पाटील,यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलनाने झाली.

आजच्या रक्तदान शिबिरात क्रिडाई कोल्हापूर चे पदाधिकारी, सभासद, युथ विंग सदस्य व क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांचा स्टाफ यांनी उस्फुर्त भाग घेऊन रक्तदान केले. तसेच या शिबीरासाठी डॉ.डी.वाय पाटील हाॅस्पिटल च्या सुपरिटेंडेंट डॉ.वैशाली गायकवाड मॅडम व ज्ञानशांती ब्लड बँक या चा स्टाफ यांनी ब्लड कलेक्शन ची उत्तम व्यवस्था ठेवली होती. तसेच रक्त दात्यांना क्रिडाई कोल्हापूर तर्फे भेट वस्तू देण्यात आल्या व अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली होती.याप्रसंगी  क्रिडाई कोल्हापूर चे सचिव  गणेश सावंत, सह खजानिस सागर नालंग, संचालक संदीप पोवार व सुनिल चिले यांनी ज्ञानशांती ब्लड बँक चे पी.आर.ओ सतीश आवटी  यांचेकडे  रक्ताच्या 100 बॅग सुपूर्द केल्या.

या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत,क्रिडाई महाराष्ट्र चे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर,क्रिडाई कोल्हापूर चे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजानीस अजय डोईजड, सहसचिव निखिल शहा,सह खजानीस सागर नालंग,संचालक गौतम परमार, प्रदीप भारमल, संदिप पोवार, अमोल देशपांडे, संग्राम दळवी, अतुल पोवार, सुनिल चिले, मौक्तिक पाटील,क्रिडाई कोल्हापूर चे माजी अध्यक्ष महेश यादव, डॉ.डी.वाय पाटील हाॅस्पिटल  च्या सुपरिटेंडेंट डॉ.वैशाली गायकवाड मॅडम, डॉ. डी.वाय.पाटील 

ब्लड बँक स्टाफ, क्रिडाई कोल्हापूर युथ विंग चे समन्वयक प्रणव क्षीरसागर, सहसमन्वयक प्रतिक होसमणी, सभासद व त्यांचा स्टाफ मोठ्या संख्येने हजर होता.शेवटी सचिव गणेश सावंत यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.