पेट्रोलला पर्याय मिळाला! E100 इथेनॉलला मंजुरी, गडकरींचा मोठा निर्णय
मुंबई (प्रतिनिधी) : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या काळात क्रूड ऑईलच्या दरात पुरवठ्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारकडून विविध उपाययोना राबवल्या जात आहे. त्यानुसार केंद्रानं E100 फ्यूएल ला मंजुरी दिली आहे.E100 चा प्रयोग यशस्वी ठरल्यास भारताची क्रूड ऑईलच्या तेलाची आयात कमी होऊ शकते. नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये E100 फ्युअलासाठी नियमांना मंजुरी दिली आहे.

केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी E85 फ्यूएल लाँच करण्यात आलं होतं. आता E100 ला मंजुरी दिल्यानं इथेनॉल ब्लेंडेड फ्यूएलची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यात ह्युंदाई, टोयोटा आणि एमजी मोटर्स सारख्या कंपन्या फ्लेक्स फ्यूएल कार लाँच करती, असं गडकरी यांनी सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वी गडकरींनी मारुती सुझुकीच्या फ्लेक्स फ्यूएलवर चालणाऱ्या वॅगनरचं लाँचिंग केलं होतं. सुरुवातीला ही कार टॅक्सी सेवा चालवणाऱ्यांना मिळेल.
E100 फ्यूएलमध्ये 100 टक्के इथेनॉल असतं, त्यामध्ये पेट्रोल मिसळलं जात नाही. इथेनॉल फ्यूएलची निर्मिती ऊस, मका, तांदूळ आणि कृषी उत्पादनांचा वापर करुन तयार केलं जातं. भारतात सध्या E20 पेट्रोलचा वापर केला जातो. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल असतं. भारताला मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईलची आयात करावी लागते. यासाठी परकीय चलन देखील द्यावं लागतं. आंतरराष्ट्रीय बजारात क्रूड ऑईलचे दर वाढल्यास त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. E100 फ्यूएल वापराद्वारे क्रूड ऑईल आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इथेनॉल उत्पादन वाढल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. इथेनॉल कार्यक्रमामुळं आतापर्यंत 1 लाख कोटी रुपये वाचले असून शेतकऱ्यांना 80 हजार कोटींचं अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. काही दिवासंपूर्वी देशात E85 फ्यूएल लाँच करण्यात आलं असून त्याची किंमत 82.12 रुपये लीटर निश्चित करण्यात आलं आहे. ते पेट्रोल पेक्षा 20 रुपये स्वस्त आहे.
E100 फ्यूएल सध्या पेट्रोलला पूर्णपणे रिप्लेस करु शकत नाही. कारण जुन्या वाहनांमध्ये त्याचा वापर करता येणार नाही. भारतातील वाहनं पेट्रोल आणि E20 नुसार बनवण्यात आली आहेत. मात्र, येत्या काळात वाहनांची जी निर्मिती होईल ती E20 आणि E100 शी सुसंगत असेल. मारुती सुझुकी आणि हिरो मोटोकॉर्प यांच्याकडून फ्लेक्स फ्यूएलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लेक्स फुएलच्या वाहनाची किंमत 70 हजारांपासून 2 लाख 26 हजारांपर्यंत आहे.




