अमित शाहांच्या शेजारी शिंदे, दिल्लीतील फोटो ठरले चर्चेचा विषय

अमित शाहांच्या शेजारी शिंदे, दिल्लीतील फोटो ठरले चर्चेचा विषय

मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीत नुकतीच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने 12 वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे एक बैठक पार पडली. यावेळी एनडीएमधील सर्व घटकपक्षांचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिघेही दिल्लीतील या बैठकीला हजर होते.

दिल्लीतील या एनडीएच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच चर्चा रंगली होती. बैठकीच्या फोटोसेशनवेळी आणि प्रत्यक्ष बैठकीवेळी एकनाथ शिंदे हे अमित शाहांच्या बाजूला होते. महाराष्ट्रातील अन्य दोन नेत्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांना मोदी-शाहांच्या जवळचे स्थान मिळाल्याने शिंदे यांचे राजकीय वजन आणखी वाढल्याची चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या फोटोसेशनच्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शेजारी उभ्या होत्या.एकनाथ शिंदे हे एनडीएच्या बैठकीत अमित शाहांच्या बाजूला बसले होते.एकनाथ शिंदे हो फोटोसेशवेळी आणि बैठकीला अमित शाहांच्या शेजारी उभे होते.दिल्लीत एकनाथ शिंदे यांचे स्वागत करताना.दिल्लीत बैठक एनडीएची पण चर्चा एकनाथ शिंदेंची, अमित शाहांच्या बाजूचं स्थान,राजधानीतील फोटोंची राज्यात चर्चा