आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य-पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य-पालकमंत्री हसन मश्रीफ

नंदुरबार (प्रतिनिधी) : नंदूरबार जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी असलेल्या त्रुटींवर मात करून आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्याच्या सूचना आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. 

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना करत बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार निवासी उपजिल्हाधिकारी आशा संगवी व विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.