गुरुवर्य श्री वामन काका पोतदार गृहतारण सहकार संस्थेचे थाटात उद्घाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : सुवर्णकार समाजाच्या प्रगतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, 'गुरुवर्य श्री वामन काका पोतदार (हुपरीकर) गृहतारण सहकार संस्था मर्यादित' या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात संपन्न झाला. दैनिक सकाळचे निवासी संपादक मा. श्री. निखिल पंडितराव यांच्या शुभहस्ते या संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना कोल्हापूर शहर व ग्रामीणचे जिल्हा समन्वयक मा. श्री. सत्यजित (नाना) कदम उपस्थित होते.

या सोहळ्याला कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सुवर्णकार समाज व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये पंचाल सोनार समाज संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रकाश पोतदार (कालेकर), पंचाळ सोनार बोर्डिंग कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रकाश कबुरे, महाभद्रकाली देवी मंदिर संस्थेचे अध्यक्ष विजयदादा वशिकर, माजी नगरसेवक विजय सरदार, प्रसिद्ध चांदी उद्योजक किरण पोतदार, दैवज्ञ बोर्डिंगचे अध्यक्ष विजय घारे, आणि दैवज्ञ ब्राह्मण सेवा संघ कोल्हापूरचे अध्यक्ष उल्हास रेवणकर यांचा समावेश होता.
यासोबतच विश्वकर्मा सुवर्णकार पतसंस्थेचे माजी अध्यक्ष एकनाथ चोडणकर (सर), चांदी कारखाना असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर ससे, माजी बोर्डिंग अध्यक्ष मधुकर पेडणेकर, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, श्री विश्वकर्मा सुवर्णकार समाज संस्थेचे संचालक अशोक पोतदार, विश्वकर्मा सुवर्णकार पतसंस्थेचे अध्यक्ष अवधूत मालवणकर, सोनार एकता फौंडेशनचे खजिनदार रामदास रेवणेकर आणि हस्तकला सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष नचिकेत भुर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या माध्यमातून समाज प्रगतीचे ध्येय
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश धर्माधिकारी यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. यानंतर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अनिलदादा पोतदार (हुपरीकर) यांनी संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टे स्पष्ट करत, आगामी काळात सभासदांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि संस्थेच्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचा समारोप सेक्रेटरी अनिष पोतदार यांनी सर्वांचे आभार मानून केला.
या उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे संचालक सर्वश्री मोहन पोतदार, सुदर्शन पोतदार, रमेश पोतदार, कपिल पोतदार, अनिल पोतदार, निलेश चिखलीकर, दीपक औंधकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, अनेक सभासद, ठेवीदार आणि सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




