जि. प. निवडणूक निकालावर ना.हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्त जागा निवडून दिल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त जनतेचे मनःपूर्वक आभार.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर २० आणि निवडणूकपूर्व आघाडी केलेले पाच अशा एकूण २५ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षांनी जिंकलेल्या आहेत. हा विजय आमचे दिवंगत नेते स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांच्या चरणी अर्पण करीत आहोत. अशी प्रतिक्रिया ना. हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर दिली. आज कै. अजितदादा पवार हयात असते तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होत आहे हे पाहून त्यांना अत्यानंद झाला असता. आज ते आपल्यामध्ये हयात नाहीत, याची खंत आम्हाला लागून राहिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करून जीवाचे रान केले त्या सर्वांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो. दरम्यान; कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता स्थापन होईल. सर्व मतदार, नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार , अभिनंदन.




