जि. प.अध्यक्ष्यांचा विविध विषयावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हयामधील खासदार, आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व पंचायत समिती सभापती आदी लोक नियुक्त लोकप्रतिनिधी हे त्यांच्या मत्तदारसंघातील विविध विकास कामासाठी पत्रव्यवहार करतात. परंतु त्यांनी दिलेल्या पत्रांवर कोणती कार्यवाही झाली का या बाबतची माहिती संबंधित लोकप्रतिनिधीना लेखी स्वरुपात मिळत नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी यांचेमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. तरी लोक नियुक्त लोकप्रतिनिधी यांचेकडून आलेल्या पत्रावर योग्य ती कार्यवाही करुन संबंधित लोकप्रतिनिधीना किमान 10 दिवसाच्या आत लेखी स्वरुपात कळवणेत यावे. तसेच त्याची प्रत अध्यक्ष कक्षाकडे देणेत यावी. या बाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांना पत्र व्यवहार केला आहे.

पत्रातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे कोल्हापूर जिल्हयामधिल ग्रामीण गावातील, वाड्यावस्तीमधील नागरीकांची कामे, विकास कामे वेळेत पूर्ण होणेसाठी "मिशन जिल्हा परिषद" ही मोहिम राबविणेचे सुनिश्चित केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद हि राज्य व देश पातळीवर गतिमान प्रशासनाबाबतीत अनेक वेळा सन्मानित केलेली आहे.त्यामुळे सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषदेकडील सर्व विभागाचे सक्षमिकरण करुन ग्रामीण भागातील रखडेली कामे तात्काळ पूर्ण करणेत यावीत.
तसेच ग्रामीण भागातील नागरीक विविध वैयक्तिक, सार्वजनिक कामासाठी जिल्हा परिषदेकडे येत असतात. त्यांची कामे विनाविलंब तात्काळ पूर्ण करुन करुन "मिशन जिल्हा परिषद" ही मोहिम यशस्वी करावी.तसेच श्री क्षेत्र जोतिबा देवस्थान, वाडी रत्नागिरी हे महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे. श्री क्षेत्र जोतिबा चैत्र पोर्णिमेच्या यात्रा 01 एप्रिल 2026 रोजी पासुन सुरु होत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात.
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुक नियम, स्वच्छता, पाण्याचा योग्य वापर करणे तसेच जेष्ठ नागरीक, महिला व लहान मुलांची विशेष काळजी घेणे तसेच स्थानिक प्रशासन व आरोग्य पथकांना सहकार्य करणेचे बाबतचे फलक जोतिबा मंदिर परिसरामध्ये लावणेत यावेत, जेणेकरुन श्री क्षेत्र जोतिबा चैत्र पोर्णिमेच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची दखल घेण्यात यावी.
कोल्हापूर जिल्हयामध्ये 'गाव तेथे स्वच्छतागृह" मोहिम राबविणे बाबत या पत्रात उल्लेख केला असून कोल्हापूर जिल्हयामधिल एकुण 1025 ग्रामपंचायती पैकी बहुतांश ग्रामपंचायती या अत्यंत दुर्गम, डोंगराळ व वाड्या-वस्त्या मध्ये विखुरलेल्या आहेत. सद्यस्थिती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना केंद्रीय वित्त आयोग व शासनाकडून मोठ्या प्रमाणावर विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन देणेत आलेला आहे. यामधुन रस्ते, गटर्स, पाणी व स्वच्छता, हागणदारी मुक्त गांव, समृद्ध ग्राम पंचायत अभियान, नळ पाणी पुरवठा योजना, शाळा, अंगणवाडया इ. माध्यमातुन सक्षमीकरण करणेत आलेले आहे.परंतु सद्यस्थितीमध्ये ग्रामपंचायतीना विज बील भरणेसाठी निधी उपलब्ध नसलेने ग्रामपंचायत पाणी पुरवठा, ग्रामपंचात इमारत, समाज मंदिर, तालमी इ. ठिकाणी असणारी विज कनेक्शन विद्युत वितरण कंपनी कडुन कनेक्शन तोडण्याचे प्रकार मोठया प्रमाणावर होत आहेत.
त्यामुळे जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतीन 15 वा वित्त आयोग बंधित निधीतुन सौर प्रणाली व गावांतर्गत सौर पथदिवे आस्थापित करणेत याव्यात. अशा अपारंपारिक स्त्रोतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास ग्रामपंचायतींना विज देयकावरीलही खर्च कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारचे विविध विषयावरील पत्र अध्यक्षानी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवल आहे.




