स्व. वसंतराव नाईक यांची जयंती जिल्हा परिषदेत उत्साहात साजरी

स्व. वसंतराव नाईक यांची जयंती जिल्हा परिषदेत उत्साहात साजरी

कोल्हापूर प्रतिनिधी - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील व उपस्थित जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या हस्ते स्व. नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जसमिन, बांधकाम व आरोग्य सभापती  सारिका नांदेकर, अर्थ व शिक्षण सभापती शितल यादव, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माने, महिला व बालविकास अधिकारी नितीन मस्के यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी, ग्रामीण विकास आणि राज्याच्या प्रगतीसाठीच्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला अभिवादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका  सुषमा पाटील मेन राजाराम यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली