जिल्हा परिषद कोल्हापूर येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्हा परिषद कोल्हापूरच्या आवारात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पिंपळे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.

    यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तसेच देशाचे माजी संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीस मोठी चालना मिळाली. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

   या प्रसंगी जिल्हा परिषदेचे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. सदर कार्यक्रमाचे निवेदन सुषमा पाटील अध्यापिका मेन राजाराम कॉलेज कोल्हापूर यांनी केले.