जीवनात येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा : संग्राम पाटील

जीवनात येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा : संग्राम पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जाताना समोर येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा,असे प्रतिपादन मार्व्हलस ग्रुपचे चेअरमन  संग्राम पाटील यांनी दिला. ते डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.श्री.पाटील यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या उपस्थितीत अकॅडमीक चॅम्पियन म्हणून सोहेल किल्लेदार याला गौरविण्यात आले.

पाटील म्हणाले,भविष्यात आपण गिग इकॉनोमी मध्ये काम करणार आहोत, त्यामुळं विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत काम करण्याची तयारी ठेवावी. एखाद्या हिऱ्याला पैलू पडल्यानंतर जसा तो चमकतो, त्याची किंमत वाढते, त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेऊन त्यांना  पैलू पाडण्याचे काम डी वाय पाटील पॉलिटेक्निक  करत आहे, असे  त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी वर्षभरातील  क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक शैक्षणिक  उपक्रमांचा आढावा घेतला.या कार्यक्रमात विविध विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवणाऱ्या सत्तावीस विद्यार्थी, विद्यार्थिनींचा तसेच  सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

 यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके, जिमखाना प्रमुख अक्षय करपे, कॉम्पुटर विभाग प्रमुख डॉ. पी. के. शिंदे, कम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख शीतल साळोखे, प्रथम वर्ष समन्वयक सुजाता शिंदे, ट्रेनिंग प्लेसमेंट इन्चार्ज अजय बंगडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.