थकबाकीदार आणि अनाधिकृत नळजोडण्यांवर महापालिकेची कारवाई ; 20 नळ कनेक्शन खंडित

थकबाकीदार आणि अनाधिकृत नळजोडण्यांवर महापालिकेची कारवाई ; 20 नळ कनेक्शन खंडित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहर व संलग्न ग्रामीण भागातील थकबाकीदार आणि अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मोठ्या थकबाकीदारांचे तसेच अनधिकृत नळजोडण्यांचे कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सातत्याने केली जात आहे.

            या मोहिमेचा भाग म्हणून बुधवारी शहरातील नागाळा पार्क, कनाननगर झोपडपट्टी व रमणमळा झोपडपट्टी परिसरात विशेष कारवाई करण्यात आली. यावेळी मोठ्या थकबाकीदार असलेल्या 20 नळ कनेक्शनधारकांचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करण्यात आले.

            ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त श्रीमती शिल्पा दरेकर आणि जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत शाखा अभियंता महानंदा सूर्यवंशी, मीटर रीडर महंमद शेख, प्रवीण वरेकर, मुकुंद माने, प्रितेश रणवरे तसेच भाग फिटर नितीन माने यांनी सहभाग घेतला.

       तरी शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांविरोधात पुढील काळातही कारवाई सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी थकीत पाणी बिले तात्काळ भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.