केंद्रीय गृहमंत्री नामदार अमितजी शहा यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा-जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर

केंद्रीय गृहमंत्री नामदार अमितजी शहा यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा-जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शहा यांच्या कोल्हापूरमधील स्वागतासाठी शनिवारी दि. २० हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी केले.कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात नियोजनासाठी तालुकानिहाय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत पाटील बोलत होते.      

भाषणात जिल्हाध्यक्ष आसुर्लेकर-पाटील पुढे म्हणाले, आपले नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार शहा यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर शहर, तालुके व गावोगावी सूक्ष्म नियोजन करा. गाव पातळीवरील अगदी बूथलेवल कार्यकर्ता, अध्यक्ष पदाधिका-यांपासून ते नेत्यांपर्यंत सूक्ष्म नियोजन करा. ग्रामसमन्वयकापासून पदाधिकाऱ्यापर्यंत, पंचायत समिती गणांचे प्रमुख पदाधिकारी व जिल्हा परिषद गटाचे सर्व प्रमुख पदाधिका-यांपासून तालुका कार्यकारिणी, विधानसभा मतदार संघ कार्यकारिणी या सर्वांनी अहोरात्र काम करा. जिल्ह्यात १३ नगरपालिका क्षेत्रातील शहराध्यक्षापासून ते नगराध्यक्ष व नगरसेवक, असे सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.

   या बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, नितीन दिंडे, अमरसिंह माने-पाटील, बाबासाहेब देशमुख, अमित गाताडे, आप्पासाहेब धनवडे, शिवाजी देसाई, युवराज पाटील, संभाजी पाटील -भुयेकर, विकास पाटील,  शिरीष देसाई, सुरेशराव चौगुले, सागर भावके आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी केले. आभार इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे यांनी मानले.