पाटबंधारे निवृत्त उपअभियंता विठ्ठलराव देसाई यांचे निधन

पाटबंधारे निवृत्त उपअभियंता विठ्ठलराव देसाई यांचे निधन

कोल्हापूर प्रतिनिधी : रुईकर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव मल्हारराव देसाई (वय 87) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.पेठवडगाव येथील देसाई मोटर्सचे मालक विजयसिंह,बांधकाम व्यवसायिक अजय सिंह आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.संजय देसाई यांचे ते वडील होत.

देसाई हे मूळ कुटुंब बेळगाव जवळील हलसीवाडी (ता. खानापूर) चे विठ्ठलराव देसाई महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या सेवेत होते. त्यांनी कोयना धरण उभारणीनंतरच्या काळात तिथे काम केले.राधानगरी धरण प्रकल्पात ते उपअभियंता होते.

  सीमा भागातील मुलांनी शिकले पाहिजे, अशी त्यांची धडपड होती. त्यासाठी त्यांना शैक्षणिक मदत करताना त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. मूळ गावांशी अजूनही त्यांनी नाते जपले होते. सीमा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी ते आजही आग्रही होते.