शरद इंजिनिअरिंगच्या ७ विद्यार्थ्यांची बेलराईज इंडस्ट्रीजमध्ये निवड
यड्राव (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ७ विद्यार्थ्यांची बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेड या नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर व इलेक्ट्रीकल या विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली.कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर विभागातील समिक्षा मगदूम, उत्कर्ष ऐतवडे, शिवानी बुबणे, इलेक्ट्रीकलमधील मिताली वाडकर, संध्या कोळी, भावना शिंगे, सक्षता बन्ने ह्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.

बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाईल घटक उत्पादक कंपनी असून दुचाकी, तीनचाकी, प्रवासी व व्यावसायिक वाहनांसाठी शीट मेटल, पॉलिमर, सस्पेन्शन, मिरर सिस्टीम आणि ई-मोबिलिटी घटकांची निर्मिती करते. १९८८ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे देशभरात १५ हून अधिक उत्पादन प्रकल्प असून ती जागतिक वाहन उद्योगासाठी दर्जेदार ऑटो कॉम्पोनंट्स पुरवणारी विश्वासार्ह कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीमध्ये १५,००० पेक्षा अधिक कर्मचारी व सहयोगी असून अमेरिका, जपान, युनायटेड किंग्डम आणि चीनसह अनेक देशांमध्ये निर्यात करते. कंपनीने ई-मोबिलिटी, एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अंतर्गत ग्रुप डिसक्शन, इंटरव्ह्यु टेक्नीक्सचा सराव, पर्सनॅलिटी डेव्हलेपमेंट, इंटरपर्सनल स्किल्स, मॉक इंटरव्हयु यांची तयारी करुन घेतली जाते. तसेच प्रोजेक्ट बेसड लर्निंग, व्हॅल्य अॅडेड प्रोग्रॅम अशी कौशल्ये दिली जातात. कंपनीपूरक प्रशिक्षण दिले जाते त्याचा फायदा विद्यार्थ्यांना या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. बी. बी. संगमे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा प्रसुन, प्लेसमेंट डिन प्रा. ए.बी. जाधव, डॉ. विद्या पाटील, प्रा. प्रियाका कबाडे यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.




