जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक पदाचा अजय जोशी यांनी कार्यभार स्वीकारला

जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक पदाचा अजय जोशी यांनी कार्यभार स्वीकारला

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका देसाई यांची नुकतीच संभाजीनगर येथे बदली झाली आहे.  त्यांच्या जागी प्रकल्प संचालक म्हणून अजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून जोशी यांनी  प्रकल्प संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. 

अजय जोशी हे मूळचे हिंगोलीचे असून, त्यांच्या शासकीय सेवेची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातून झाली. ते सध्या पुणे येथे विभागीय आयुक्तालय कार्यालयात सहायक आयुक्त तपासणी पदावर कार्यरत होते. जोशी यांना विदर्भ,खानदेश, मराठवाडा येथील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे.