डॉ. घाळी महाविद्यालयात पोलीस भरती व सरळसेवा मार्गदर्शन वर्गाची प्रवेश परीक्षा संपन्न

डॉ. घाळी महाविद्यालयात पोलीस भरती व सरळसेवा मार्गदर्शन वर्गाची प्रवेश परीक्षा संपन्न

गडहिंग्लज (प्रतिनिधी) - डॉ. घाळी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस भरती व सरळसेवा मार्गदर्शन वर्गासाठीची सामाईक प्रवेश परीक्षा आज उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयाच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला असून, एकूण १४० इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सहभाग नोंदवला.

ही ओएमआर (OMR) आधारित चाळणी परीक्षा सकाळी ११ ते १२ या वेळेत अत्यंत शांत आणि पारदर्शक वातावरणात घेण्यात आली. या परीक्षेची सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, परीक्षा संपताच अवघ्या १२ वाजून १ मिनिटांनी उत्तरतालिका (Answer Key) स्पर्धा परीक्षा ग्रुपवर तातडीने प्रकाशित करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे स्वयं-मूल्यमापन (Self-assessment) करणे सोपे झाले आणि त्वरित निकाल तपासता आला.

परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. परीक्षेची मोहोरबंद प्रश्नपत्रिका मा. प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांच्या हस्ते उघडण्यात आली, तर ओ.एम.आर. सीटचे मोहोरबंद लिफाफे मराठी विभाग प्रमुख डॉ. शेळके यांच्या हस्ते उघडण्यात आले.चाळणी परीक्षेची विषयवार प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी प्रा. प्रधान, प्रा. वारके आणि प्रा. कुलकर्णी यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. तर, मूल्यांकन प्रक्रियेत (उत्तरपत्रिका तपासणीत) निष्पक्षता राखण्यासाठी त्रयस्थ मूल्यमापक म्हणून एम.एस्सी. विभागाचे प्रा. सचिन माने यांची मदत घेण्यात आली.

सदर परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी (Merit List) तयार करून, त्यातील निवडक ८० विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन वर्गात प्रवेश दिला जाईल. या ८० विद्यार्थ्यांना आगामी ९० दिवसांसाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या सर्व विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

यावेळी स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा. व्ही. पी. प्रधान यांनी विभागाच्या भविष्यातील योजना स्पष्ट केल्या. ते म्हणाले, "स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी नवनवीन संकल्पना आणि नाविन्यपूर्ण उपक्रम येत्या काळात हा विभाग घेऊन येईल."

या संपूर्ण उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रेरणा लाभली. सदर परीक्षा यशस्वी करण्यासाठी डॉ. एस. एस. संघराज, डॉ. शेळके, प्रा.ग्रंथपाल सावेकर आर. एस, प्रा. आर. डी वारके सर, प्रा. ए. व्ही. कुलकर्णी, प्रा. सचिन माने, कर्मचारी राजू गवळी आणि महाजन यांचे सक्रिय सहकार्य लाभले.