मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंच उदघाटन सोहळ्यादिवशी वाहतूक व्यवस्था 'या' प्रमाणे
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर शहरामधील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोर असलेल्या जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचचे प्रत्यक्ष कामकाजास १८ ऑगस्ट रोजी पासून सुरवात होणार आहे. १७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्कीटबेंचचा उद्घाटन सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री व इतर मंत्रीमंडळातील इतर राजकीय नेते यांचे उपस्थित मेरीवेदर ग्राऊंड तसेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे समोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये संपन्न होणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा तसेच आजुबाजूचे जिल्हयातील राजकीय, सामाजीक, प्रतिष्ठित व्यक्ती, वकिल तसेच इतर क्षेत्रामधील व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने या परिसरामध्ये लोकांची गर्दी मोठया प्रमाणावर आहे. या परिसरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. सामान्य जनतेस नियमित व्यवहार पार पाडण्यास अडसर निर्माण होवु नये याकरीता या मार्गावरील रहदारी नियमन बाबत पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत.
(अ) सर्कीटबेंच न्यायालय इमारत येथील कार्यक्रम दरम्यान वाहतूकीसाठी आवश्यकते नुसार प्रवेश बंद करण्यात अगर वळविण्यात आलेले मार्ग -
(पोलीस वाहन, फायर बिग्रेड व अॅम्ब्युलन्स वाहने वगळून)
०१ सीपीआर कडून भवानी मंडपकडे जाणारी वाहने शिवाजीपुल अगर दसरा चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
०२ शिवाजीपुल ते सीपीआर चौकाकडे येणारी वाहने शिवाजीपुल येथून गंगावेश मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
०३ दाभोळकर कडून सीपीआर चौकाकडे येणारी वाहने व्हिनस कॉर्नर येथून फोर्ड कॉर्नर/कोंडाओळ मार्गे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
०४ भवानी मंडप कडून सीपीआर चौकाकडे येणारी वाहने माळकर तिकटी, लुगडी ओळ मार्गे सोयीनुसार मार्गस्थ होतील. माळकर चौकाकडुन सारस्वत बँक चौक तसेच शनीवार पोष्ट ऑफिस चौकाकडे जाणेस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
०५ मराठा बँक, शनिवार पोस्ट ऑफीस कडून येणा-या सर्व वाहनांना शनिवार पोस्ट ऑफीस चौकातून सीपीआर कडे येण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहन चालकांनी सोयीनुसार पर्यायी मार्गचा वापर करावा.
०६ फुलेवाडी नाक्याकडुन रंकाळा टॉवर दिशेने येणारी वाहने फुलवाडी नाका, नविन वाशी नाका, साई मंदिर चौक मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
०७ रंकाळा टॉवर, जॉकी बिल्डींग येथुन शहरात प्रवेश करण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्याठिकाणाहुन वाहनधारकांनी देवकर पाणंद, संभाजीनगर मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे.
(ब) मेरीवदेर ग्राऊड येथील कार्यक्रम दरम्यान वाहतूकीसाठी आवश्यकते नुसार प्रवेश बंद करण्यात अगर वळविण्यात आलेले मार्ग -
०१ सीपीआर कडून पोस्ट ऑफीस चौकाकडे जाणारे वाहनांना महावीर कॉलेज येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी खानिवलकर पेट्रोल व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे पुढे सोयीनुसार मार्गाचा वापर करण्याचा आहे.
०२ कसबा बावडा चौकातून सीपीआर चौकाकडे जाणारे वाहनांना पोलीस अधीक्षक चौकामध्ये प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहन चालकांनी लाईन बाझार या पर्यायी मार्गाचा सोयीनुसार मार्गाचा वापर करण्याचा आहे.
(क) महासैनिक दरबार येथील कार्यक्रम दरम्यान वाहतूकीसाठी आवश्यकते नुसार प्रवेश बंद करण्यात अगर वळविण्यात आलेले मार्ग -
०१ कसबा बावडा येथून सर्कीट हाऊसकडे जाणारे वाहनांना लाईन बझार येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहन चालकांनी चार नंबर फाटक, पोलीस अधीक्षक चौकातून पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
०२ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून धैर्यप्रसाद मार्ग लाईन बझार कडे जाणारे वाहनांना धैर्यप्रसाद हॉल चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहन चालकांनी पितळी गणपती अगर सदर बाजार रोडने पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
(ड) VVIP यांचे मार्गावर शिथील करण्यात येणारे वन वे मार्ग -
०१ दुर्गा चौक ते खॉसाब पुतळा चौक हा वन वे मार्ग व्हिव्हिआयपी यांचे कॅन्वाय मधील सर्व वाहनाकरीता मार्गक्रमण दरम्यानचे मुदतीत करीता शिथील करण्यात येत आहे.
०२ मिरजकर तिकटी ते बिनखांबी हा वन वे मार्ग व्हिव्हिआयपी यांचे कॅन्वाय मधील सर्व वाहनाकरीता मार्गक्रमण दरम्यानचे मुदतीकरीता शिथील करण्यात येत आहे.
(इ) VVIP संपुर्ण दौरा मार्गावरील वाहतूक कॅन्वाय मार्गक्रमण करीत असताना आवश्यकतेनुसार थांबविण्यात अगर वळविण्यात येईल.
(ई) एस.टी. व केएमटी बसेस करीता सुरक्षिततेचे कारणास्तव वळविण्यात आलेला वाहतूक मार्ग (सर्कीट बेंच उद्घाटन सोहळा अनुषंगाने सीपीआर चौक, मेरीवेदर ग्राऊड या ठिकाणचे मार्गावर येणार नाहीत.)
०१ मध्यवर्ती बसस्थानक येथून शाहुवाडी मार्गे कोकणात जाणारे एस.टी. बसेस हया VVIP यांचे संपुर्ण दौरा कालावधीत मध्यवर्ती बसस्थानक येथून दाभोळकर कॉर्नर व्हिनसकॉर्नर येथून डावीकडे वळून फोर्ड कॉर्नर- उमा टॉकीज - सावित्रीबाई फुले हॉस्पीटल यल्लमाओढा चौक हॉकी स्टेडिअम संभाजीनगर क्रेशर चौक रंकाळा टॉवर- रंकाळा स्टॅड- गंगावेश, शिवाजीपुल मार्ग मार्गस्थ होतील अगर आवश्यकता वाटलेस त्यांनी तावडे हॉटेल, सांगली फाटा या मार्गाचा वापर करुन सादळे मादळे मार्गे कोकणामध्ये मार्गस्थ होतील.
०२ शाहुवाडी येथून कोल्हापूर मध्ये प्रवेश करणा-या एस.टी. बस या वडणगे फाटा निगवे, भुये शिये - हायवे रोडने मध्यवर्ती बस स्थानक साठी पुढे मार्गस्थ होतील.
०३ कसबा बावडा येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाकडे जाणारे केएमटी बस चालक यांनी लाईन बझार -धैर्यप्रसाद चौक ताराराणी पुतळा दाभोळकर चौक व्हिनसकॉर्नर-फार्ड कॉर्नर- महाराणा प्रताप चौक मार्गे मार्गस्थ होतील.
०४ छत्रपती शिवाजी पुतळा चौकाकडून कसबा बावडा कडे जाणारे केएमटी बस चालक यांनी माळकर तिकटी लुगडी ओळ - व्हिनस कॉर्नर दाभोळकर चौक ताराराणी पुतळा धैर्यप्रसाद चौकातून लाईन बझार मार्गे मार्गस्थ होतील.






