रस्त्याची अपुरी कामे तात्काळ पूर्ण करा, अन्यथा... : बीडशेड परिसरातील नागरिकांचा इशारा

रस्त्याची अपुरी कामे तात्काळ पूर्ण करा, अन्यथा... :  बीडशेड परिसरातील नागरिकांचा इशारा

करवीर (विश्वनाथ मोरे) - बीडशेड (ता. करवीर ) येथे राज्यमार्ग रस्त्याच्या कामासंदर्भात परिसरातील ग्रामस्थ व रचना कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांच्यात भर चौकात बैठक पार पडली. यावेळी बैठकीत यशवंत बँकेचे संचालक नंदकुमार पाटील म्हणाले, रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. कोल्हापूर - बालिंगा ते दाजीपूर राज्यमार्गासाठी रस्त्याची कामे रेंगाळत चालल्यामुळे या मार्गावरील प्रवाशी, ग्रामस्थ व वाहनचालकाना प्रचंड त्रास व अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर कंपनीचे मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याच्या संतप्त भावना व्यक्त करत रस्त्याची अपुरी कामे तात्काळ पूर्ण करा...अन्यथा काम बंद पाडू, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला. या चर्चेसाठी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रवींद्र बिर्ला उपस्थित होते. तेव्हा त्यांनी तीन महिन्यांत अपूर्ण काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. 

 कुंभी कारखान्याचे संचालक दादासाहेब लाड, वीरशैव बँक संचालक अनिल सोलापुरे, एस.के.पाटील, माधव पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.के.एन. पाटील, गजानन खोत, डी. के. खाडे, दुकानदार कृष्णात माने आदींनी परखड मते मांडली. यावेळी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रवींद्र बिर्ला यांनी ग्रामपंचायत व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ, पावसामुळे कामास विलंब होत आहे. येत्या तीन महिन्यांत सर्व अपुरी कामे पूर्ण केली जातील अशी ग्वाही दिली. 

यावेळी कुंभी कारखान्याचे संचालक दादासाहेब लाड, वीरशैव बँक संचालक अनिल सोलापुरे, एस.के.पाटील, माधव पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.के.एन. पाटील, गजानन खोत, डी. के. खाडे, दुकानदार कृष्णात माने, कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रवींद्र बिर्ला, बलभीम विकास सेवा सचिव संजय पाटील आदी उपस्थित होते .