राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् बँकेचे विविध कार्यक्रम 5 सप्टेंबर रोजी
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर राजर्षि शाहू गव्हमेंट सव्हॅटस् को ऑप बँकेमार्फत यापूर्वी स्थगित करणेत आलेला " पद्याराजे पारितोषिक" रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम तसेच "सेवानिवृत्त सभासद सत्कार" समारंभ, मोफत आरोग्य तपासणी शिबीर" व " ग्राहक मेळावा" कार्यक्रम शुक्रवार 05 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित केलेला आहे.

सदरचा कार्यक्रम प्रमुख वक्ते गणेश शालन आत्माराम शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजित मंदाकिनी शिवाजी म्हेत्रे अधीक्षक अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर व प्रमुख उपस्थिती योगेश कुमार पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर व तुषार सुनिता अरुण बुरुड - अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

अद्याप ज्या सेवानिवृत्त झालेल्या सभासदांनी व पात्र मुलामुलींकरीता बँकेकडे अर्ज सादर केलेले नाहीत अशा पात्र मुलामुलींकरीता व सेवानिवृत्त सभासदांनी बँकेकडे या बावतचे अर्ज गुणपत्रिकेच्या साक्षांकित सत्य प्रतिसह बँकेच्या प्रधान कार्यालय अथवा नजिकच्या शाखांमध्ये मंगळवार 02 सप्टेंबर अखेर सादर करावेत असे आवाहन बँकेचे अध्यक्ष रोहित रोहिणी प्रकाश बांदिवडेकर यांनी पत्रकाव्दारे केले आहे. अर्ज सादर करीत असताना त्या मध्ये सभासदांचे संपूर्ण नाव, पत्ता, फोन क्रमांक, सभासद क्रमांक आणि ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक पाल्यासाठी स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा.




