राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील गुन्ह्यातील पात्र वस्तुंचा जाहीर लिलाव

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील गुन्ह्यातील पात्र वस्तुंचा जाहीर लिलाव

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या अधिपत्याखालील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.1 यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत नोंदविलेल्या गुन्ह्यातील पात्र वस्तुंचा जाहीर लिलाव  30 जून रोजी सकाळी 11 वाजता निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. 1, कोल्हापूर यांचे कार्यालय, जुनी दारुभट्टी, रंकाळा टॉवर येथे होणार असून या लिलावात भाग घेण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी केले आहे.

लिलावाच्या अनुषंगाने लिलावाच्या अटी व शर्तीबाबत आवश्यक माहिती Kolhapur.gov.in या संकेत स्थळावर तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर यांचे कार्यालय व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी व्यक क्र.1 यांच्या कार्यालयाच्या प्रसिध्दीपत्रक फलकावर कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच जाहीर लिलावाचे ठिकाण, वेळ व दिनांक यामध्ये सोईनुसार बदल करण्याचे हक्क अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर कार्यालयाकडे राखून ठेवण्यात येत आहेत, असेही नरवणे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.