लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग; उड्डाणे तात्काळ रद्द

लाहोर : लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अचानक लागलेल्या भीषण आगीत मोठा गोंधळ उडाला आहे. या घटनेमुळे विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्काळ रद्द करण्यात आली आहेत. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
लाहोर विमानतळ पाकिस्तानमधील एक महत्त्वपूर्ण विमानतळ असून, या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तात्पुरत्या स्वरूपात पाकिस्तानातील विमानसेवा थांबवण्यात आली आहे.