शरद इंजिनिअरिंगमध्ये ९ एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा

शरद इंजिनिअरिंगमध्ये ९ एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा

यड्राव : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बुधुवार (ता.९) एप्रिल रोजी इनोव्हेशन २०२५ या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेच आयोजन केले आहे. ह्या स्पर्धा इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन (ISTE) स्टुडंट चॅप्टर, इशरे, आय.आय.सी. (इन्स्टिटयुशनस इनोव्हेशन कॉन्सिल), आय.ई.ई.ई. यांच्य़ा संयुक्त विद्यमाने होत आहेत. विजेत्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्रसह अडिच लाख रूपयांपेक्षा अधिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. 

पेपर प्रेझेन्टेशनमध्ये सर्व विभागातील विविध विषयावर शोध निबंध सादरीकरण होणार आहे. जावा मास्टर, डिबेट, स्पीच, आयडिया थॉन, ब्रेक अॅण्ड बिल्ड चॅलेंज, आय.क्यु क्लॅश, कॅड मॉडेलिंग, पोस्टर प्रेजेन्टेंशन, फिल्ड मास्टर, इ कॅडमॅनिया, कार्पोरेट विकी, स्टार्टअप मेला, गेट प्लेस यासह विविध २६ स्पर्धा होणार आहेत. 

आतापर्यंत देशभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोदवला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व अभ्यासाबरोबर तांत्रिक व प्रात्यक्षिक ज्ञान अवगत व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे नियोजन समन्वयक प्रा. शारदा साळुंखे यांच्यासह डॉ. सुजित कुंभार, डॉ. कृष्णकांत साहु, प्रा. वर्षा जुजारे, प्रा. शितल घोरपडे, प्रा. प्रतिभा स्वामी, प्रा. चेतन पाटील, प्रा. सुश्मिता पाटील, प्रा. अंजली झळके, प्रा. कौसर नदाफ व विद्यार्थ्यांनी केले आहे.