शरद पवारांच्या फोननंतर मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले..?

शरद पवारांच्या फोननंतर मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले..?

मुंबई - भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याविषयी खालच्या पातळीची टीका केली होती. या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन केलं, तर पक्षप्रमुख शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य योग्य आहे असं मी मानत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुटुंबाबद्दल अशा प्रकारे बोलणं योग्य नाही. मी स्वतः पडळकरांशी बोललो असून, त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की अशा प्रकारची भाषा आम्ही कधीच समर्थनार नाही."

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, "पडळकर हे तरुण आणि आक्रमक नेते आहेत. पण बोलताना आपल्या शब्दांचा काय अर्थ निघू शकतो, याचं भान ठेवायला हवं. भविष्यात त्यांना मोठी संधी मिळू शकते, त्यामुळे प्रत्येक वक्तव्याची जबाबदारीने मांडणी केली पाहिजे."