शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी दसऱ्याच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा
कागल (प्रतिनिधी) - कागल येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरमध्ये शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी दसरा सणानिमित्त नागरिकांना सोने वाटप करत शुभेच्छा दिल्या. दसरा सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी आबालवृद्ध नागरिकांनी गर्दी केली होती. या सर्वांशी आपुलकीने संवाद साधत घाटगे यांनी शुभेच्छा दिल्या.

शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून शहराच्या मध्यवर्ती असलेल्या खर्डेकर चौकात ऐतिहासिक श्रीराम मंदिराची उभारणी करण्यात आली आहे, दसरा सणाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यास त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आज दसरा सणाच्या शेवटच्या दिवशी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत घाटगे बंधूंनी नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.




