"शेवटी उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीराम आठवले याचा आनंद"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका
चंद्रपूर/मुंबई: अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर संस्थानातील कथित चोरी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबईत 'रामरक्षा' आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. "शेवटी उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीराम आठवले, याचा मला आनंद आहे," असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. ते चंद्रपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.





