आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा गुणगौरव सोहळा दिमाखात संपन्न

आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा गुणगौरव सोहळा दिमाखात संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी): आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्युट, सानेगुरूजी वसाहत, कोल्हापूर यांचे मार्फत सैनिक स्कूल व इतर स्पर्धा परिक्षांमध्ये उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचा गुणगौरव सोहळा पेटाळा येथील श्री राम गणेश गडकरी हॉल येथे दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड. संभाजी मोहिते सर यांचे सुजाण पालकत्व या विषयावर मोलाचे मार्गदर्शन मुलांना लाभले.

या कार्यक्रमाला नवनाथ देशमुख सर संस्थापक आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्युट आणि अभिजीत मस्के सर डेप्युटी कलेक्टर, अमरावती यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची रुपरेषा डॉ. पुजा कुलकर्णी संचालिका आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्युट, कोल्हापूर यांनी केली. सुत्रसंचलन  सेजल माने व  गौरी धुमाळ यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता संध्याताई बोके, माजी प्राचार्या छत्रपती शिवाजी हायस्कूल, अमरावती यांनी पसायदानाने केली. या कार्यक्रमाला पालकांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.