आशियाई स्पर्धेत कुस्ती खेळात गोल्ड मेडल मिळवलेल्या रोहिणी देवबा हिचा उंचगावात सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : थायलंड येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताला कुस्ती या खेळात पट्टणकडोली गावची कन्या रोहिणी खानदेव देवबा हिला गोल्ड मेडल मिळाले. उंचगाव येथील कन्या विद्या मंदिर या शाळेच्यावतीन रोहिणीचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शहाजीराव पाटील, मुख्याध्यापक सुनील कुरणे, शुभदा सुतार, डाॅ.निशा काजवे,प्रतिभा देसाई, संध्या कासार, आशाराणी भोसले, रवींद्र बडे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णात रेवडे, उपाध्यक्ष गणेश नागटिळक, आनंद यादव शाळा व्यवस्थापन समितीमधील सर्व सदस्य व सुधीर संजय धनगर, खानदेव देवबा हे उपस्थित होते. कन्या विद्या मंदिर उंचगाव शाळेच्या वतीने मुख्याध्यापक शहाजीराव शंकर पाटील यांनी गोल्ड कन्या रोहिणी हिला शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.