इतिहासाचा व्यासंगी बालेकिल्ला ढासळला - आमदार अमल महाडिक

इतिहासाचा व्यासंगी बालेकिल्ला ढासळला - आमदार अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाचे वृत्त खेददायक आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा व्यासंग हरपला आहे. तब्बल ५० वर्षे त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे सखोल संशोधन केले. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अप्रकाशित इतिहासाला प्रकाशित करण्याचे महान कार्य त्यांनी केले. राजर्षी शाहू स्मारक ग्रंथाचे त्यांनी केलेले लेखन आणि संपादन येणाऱ्या पिढ्यांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करत राहील.अशी प्रतिक्रिया आ.अमल महाडिक यांनी दिली