उत्तम अभिनेत्री-निर्माती असूनही प्राजक्ता माळीला व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली? तिची स्पष्ट कबुली
मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायम तिच्या अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्यावरुनाही कायम चर्चेत असते. तिने अलीकडेच तिचा मराठमोळ्या दागिन्यांचा brand सुरु केलाय. सध्या 'स्टार्ट अप इंडिया' चं बाळसं धरलेलं असताना फेल होणाऱ्या स्टार्टअपचा भारतातील आकडाही 90 टक्के आहे. पण एकीकडे उत्तम अभिनेत्री, नव्यानेच निर्माती म्हणून पुढे जात असताना दुसरा व्यवसाय सुरु करण्याचा विचार अभिनेत्री प्राजक्ता माळीने का केला? याचं कारण तिने 'ABP माझा' च्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' मध्ये सांगितलंय.

प्राजक्ता म्हणाली, "महाराष्ट्राशी नाळ जोडलेला असा हा ब्रँड आहे, जेवढे आपले मराठी दागिने आणि अलंकार काळाच्या पडद्याआड गेलेत, ते पुन्हा पुनर्जित करण्यासाठीच या ब्रँडची स्थापना झाली आहे. कारण दागिने, मराठी दागिने आणि 100 वर्ष किंवा त्याहून दागिने आपल्या ब्रँडमध्ये सहभागी केले आहेत. मला दोन-तीन गोष्टी कारणीभूत ठरल्या ब्रँड सुरू करण्यासाठी.अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू असताना मला असं वाटलं की, या क्षेत्रात मी आहे, हेच मूळात कारण आहे.अभिनेत्रीचं आयुष्य एवढं परावलंबी आहे, इतकी आर्थिक अरसुरक्षितता आहे, वाचनामुळेही मला सतत लक्षात आलं की, उतरत्या काळात झालेली कलाकारांची अवस्था, कारण त्यांनी अजिबात आर्थिक मॅनेजमेंट केलं नाही, सेविंग्स केल्या नाहीत.मग मध्येच कोरोना येऊन गेला.मनोरंजन सुरू व्हायला सगळ्यात उशीर झाला हेच फॅक्टर्स मला ट्रिगर होत गेले की, काहीतरी करावं लागेल, यावर अवलंबून राहू शकत नाही. असं ती म्हणाली.
तिने पुढे सांगितलं,आपल्याला जर स्वतंत्र आणि स्वाभिमानी व्यक्ती म्हणून जगायचंय आणि त्यासोबत कलाकार आणि स्त्री म्हणून जगायचं तर आर्थिकरित्या स्वावलंबी असायलाच हवं. मी ऐतिहासिक पुस्तकं खूप वाचलीत.त्यामुळे मी खूपच मराठी झालीय. महाराष्ट्राशी माझी नाळ घट्ट जोडली गेली. इतिहासात मी खूप रमते आणि खूपच रिलेट करते.त्याचाही परिणाम मी ब्रँड सुरू करण्यामागे आहे.




