8 बॉलिवूड स्टार्स, 100 कोटींचं बजेट; ‘राजा शिवाजी’साठी कुणी किती घेतले मानधन? अभिषेक–संजय दत्त टॉपवर, जिनिलिया सर्वात कमी!
मुंबई (प्रतिनिधी) : 'राजा शिवाजी' हा सध्या चर्चेत असलेला आणि मे 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या सिनेमांपैकी एक मानला जातो. सुमारे 100 कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये हा सिनेमा साकारला गेला असून, रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांची दमदार स्टारकास्ट यात पाहायला मिळणार आहे.रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. टीझर आणि ट्रेलरमध्ये झळकलेल्या कलाकारांच्या जोरदार चर्चा रंगल्या. अशातच आता या दिग्गज स्टारकास्टच्या मानधनाच्या चर्चा रंगल्या आहेत.

'राजा शिवाजी' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकलेल्या रितेश देशमुख यानं अंदाजे 15 ते 18 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, रितेश देशमुख यानं केवळ अभिनयच नाहीतर दिग्दर्शन आणि सहलेखनाचाही जबाबदारी सांभाळली आहे.'राजा शिवाजी' या सिनेमात अभिषेक बच्चन एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत असून, तो संभाजी शहाजी भोसले यांचं पात्र साकारतोय. त्याला 6 ते 8 कोटी रुपयांचं मानधन देण्यात आल्याचं सांगितलं जातंय.अफजल खानाच्या भूमिकेत दिसणाऱ्या संजय दत्तनं, आपल्या या भूमिकेसाठी 8 ते 10 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं वृत्त आहे. 'धुरंधर 2' या सिनेमासाठी त्याला जेवढं मानधन मिळालं होतं, साधारणपणे तितकीच रक्कम त्याला या सिनेमासाठीही दिली जात असल्याचं सांगितलं जातंय.
'राजा शिवाजी' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी, महाराणी सईबाई यांची भूमिका साकारणाऱ्या जिनिलियाला 1 ते 2 कोटी रुपयांचं मानधन देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या चित्रपटाची निर्माती म्हणूनही ती काम पाहत आहे.फरदीन खान 'शाहजहाँ'च्या भूमिकेत दिसणार असून, मीडिया रिपोर्टनुसार, त्यालाही 2 ते 3 कोटी रुपये मानधन मिळालंय.यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेले महेश मांजरेकर आता रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमात लखुजी जाधव यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या भूमिकेसाठी त्यांना 2 ते 3 कोटी रुपये मिळाले आहेत.विद्या बालन 'राजा शिवाजी' या चित्रपटात 'ताजल मुखिदरात'च्या भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिला 1.5 कोटी रुपये मानधन दिलं गेलंय.
राजा शिवाजी' हा सिनेमा 1 मे 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये जिजाबाईंच्या भूमिकेत भाग्यश्री, शहाजी भोसले यांच्या भूमिकेत सचिन खेडेकर आणि मोहम्मद आदिल शाह यांच्या भूमिकेत अमोल गुप्ते यांचा समावेश आहे.रिलीजपूर्वीच, या सिनेमाला काही प्रमाणात टीकेचाही सामना करावा लागतोय. रितेश देशमुख छत्रपती शिवराय आणि संजय दत्त अफझल यांची भूमिका साकारतोय, यातल्या काही सीन्सवर नेटकऱ्यांनी टीकाही केली आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर, काही प्रेक्षकांनी चित्रपट निर्मात्यांवर ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केल्याचा आरोप केला आहे.




