हवेलीतल्या हॉरर कॉमेडीचा बॉक्स ऑफिसवर थरार
मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार सध्या त्याचा चित्रपट 'भूत बंगला'मुळे चर्चेत आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला असून, या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमाने थिएटरमध्ये आपला पहिला विकेंड पूर्ण केला. चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. या सिनेमाची कमाई अपेक्षाप्रमाणे खूप चांगली झाली आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. या चित्रपटाला विकेंडमध्ये चांगलंच यश मिळालं. दमदार ओपनिंग मिळाल्यानंतर या सिनेमाने आता बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे. चला पाहूयात, प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या सिनेमाने किती कोटींची कमाई केलीये.

'भूत बंगला'कडून अक्षय कुमारच्या कारकिर्दीला पुन्हा रुळावर आणण्याची अपेक्षा आहे. प्रियदर्शन आणि अक्षय कुमारची जादू या चित्रपटातून झळकली आणि प्रेक्षकांना आवडली. तीन दिवसांच्या कमाईनंतर हा सिनेमा आणखी तुफान चालणार, अशी माहिती आहे. 'भूत बंगला' या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, पेड प्रिव्ह्युमध्ये या सिनेमाला फारसे यश मिळाले नाही. या सिनेमाने 3.75 कोटींची कमाई केली. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 12.25 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी, चित्रपटाची कमाई 19 कोटींवर पोहोचली. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने उत्तम कमाई केली. तर, रविवारी 'भूत बंगला'च्या कमाईत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. तीन दिवसांत चित्रपटाची कमाई 58 कोटींवर पोहोचली आहे. या चित्रपटाची तीन दिवसांची एकूण कमाई 69.67 कोटी इतकी झाली आहे.
'भूत बंगला' या चित्रपटाने केवळ भारतात नाही तर, परदेशातही उत्तम कमाई केली आहे. चित्रपटाने परदेशात तीन दिवसांत दमदार कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी 'भूत बंगला' या चित्रपटाने अंदाजे 7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाची तीन दिवसांची परदेशातील एकूण कमाई 26.50 कोटी झाली आहे. माहितीनुसार, वर्ल्डवाईड 'भूत बंगला' या सिनेमाने एकूण 95.87 कोटींची कमाई केली आहे. 'भूत बंगला' या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत जरी असले तरी, चित्रपट बॉक्स ऑफिसवर घौडदौड करत आहे. या चित्रपटाचे बजेट 120 ते 150 कोटींच्या आसपास आहे. अशातच पहिल्याच विकेंडमध्ये 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणे ही काही साधी गोष्ट नाही. एकूणच अक्षय कुमारचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, हा सिनेमा 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो की नाही, हे पाहणे बाकी आहे.




