ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील पाण्याचे राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी केले विधीवत जलपूजन

ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील पाण्याचे राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी केले विधीवत जलपूजन

कागल (प्रतिनिधी) - सव्वाशे वर्षापूर्वी  छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात पिराजीराव घाटगे यांनी बांधलेला ऐतिहासिक जयसिंगराव तलाव यावर्षी झालेल्या पावसामुळे  पूर्ण क्षमतेने भरून ओसांडून वाहू लागला आहे. १३१ वर्षानंतरसुद्धा मजबूत स्थितीत असलेल्या व कागल शहरवासीयांच्या स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची तहान भागवीत असलेल्या या तलावातील पाण्याचे विधिवत पूजन छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी केले. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यातून दोन वर्षांपूर्वी या तलावातील  गाळ उपसा केला होता. त्यामुळे तलावातील पाण्याची जलसिंचन क्षमता वाढली आहे. आता हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईस तोंड द्यावे लागणार नाही. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

दोन वर्षापूर्वी ऐन उन्हाळ्यात या तलावातील पाण्याने तळ गाठला होता.पाणी साठवणूक  क्षेत्र कोरडे पडले होते.तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणीसाठ्यावर परिणाम होऊन पाणीटंचाईस सामोरे जावे लागले होते. या संकटातही तलावातील गाळ काढण्यासाठी मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे  शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगेंनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यात सर्वप्रथम आठ हजार ट्राॕल्या गाळ काढण्याचे काम झाले होते.राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या माध्यमातून  राबविलेल्या या उपक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.त्यामुळे तलावातील पाणी साठवणूक क्षमता वाढली. शिवाय शेतकऱ्यांना जमिनीत पसरण्यासाठी गाळ उपलब्ध झाल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली.असा दुहेरी  फायदा या उपक्रमामुळे झाला. घाटगे यांनी केलेल्या  पाठपुराव्यामुळे जेसीबी मालक व शेतकऱ्यांना दोन वर्षे प्रलंबित असलेली सोळा लाख रुपये इतकी रक्कमसुद्धा राजे फौंडेशनच्या पुढाकारातून त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक सतीश पाटील,माजी उपनगराध्यक्ष आनंदा प्रसारे,संजय कदम,राज बॅंकेचे  संचालक सुशांत कालेकर, प्रवीण कुराडे,माजी संचालक  विजय बोंगाळे,राजेंद्र जाधव,विवेक कुलकर्णी,प्रमोद कदम,गजानन माने,  संजय अतवाडकर,बाळासो नाईक,बाळू हेगडे,चेतन भगले,समीर नायकवडी,आनंदा भोपळे,पांडुरंग जाधव,संतोष मिसाळ,संतोष निंबाळकर,प्रदीप कोराणे,तानाजी ढेरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.