जिद्द व चिकाटीच्या जोरावर गर्जनच्या गौरव देसाईने मिळविले यश

जिद्द व चिकाटीच्या जोरावर गर्जनच्या गौरव देसाईने मिळविले यश

करवीर (प्रतिनिधी):  स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून सरकारी अधिकारी होणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते, अशाच स्वप्नाला साकार करत गर्जन तालुका करवीर या एका छोट्या गावातील तरुणाने मोठी झेप घेतली, या छोट्याशा गावातील गौरव गजानन देसाई याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत कर सहाय्यक परीक्षेत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे.

शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या गौरवचे प्राथमिक शिक्षण गर्जन व माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज येथे झाले. इंजीनियरिंग तात्यासाहेब कोरे कॉलेज येथून झाल्यानंतर 2019 नंतर स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे स्वप्न होते, पण सतत निकालात अपयश यायचे, परंतु कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर सातत्याने अभ्यास आणि आत्मविश्वास यामुळे गौरवणे मुख्य परीक्षेतही बाजी मारली.

     गौरवच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. आपल्या अधिकारी होण्यामध्ये माझ्या काकांची मिळालेली साथ मोलाची आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले.