‘झापुक झुपूक’ची या आठवड्यात नेमकी कमाई किती ?

‘झापुक झुपूक’ची या आठवड्यात नेमकी कमाई किती ?

मुंबई: बिग बॉस मराठी सीझन ५ विजेता सूरज चव्हाणचा झापुक झुपूक हा सिनेमा प्रेक्षकांना अपेक्षित प्रमाणात आकर्षित करू शकलेला नाही. आठवड्याभरात या सिनेमाने सुमारे १ कोटी २४ लाखांची कमाई केली असली तरी, सुमारे पाच कोटींच्या बजेटच्या तुलनेत ही कमाई कमी असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

पहिल्या दिवसाला २४ लाखांची सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही इतकीच कमाई झाली, मात्र पुढच्या दिवसांपासून आकडे कमी होत गेले. सातव्या दिवशी केवळ ५ लाखांची कमाई नोंदली गेली.

झापुक झुपूकची घोषणा केदार शिंदे यांनी बिग बॉसच्या मंचावर केली होती. त्या वेळीच काही संमिश्र प्रतिक्रिया आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंग पाहायला मिळालं होतं. सिनेमात सूरजबरोबर जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कराज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बॉलीवूडच्या केसरी २, रेड २सारख्या मोठ्या चित्रपटांच्या स्पर्धेमुळे आणि सोशल मीडियावर झालेल्या टीकेमुळे मराठी सिनेमाला फटका बसल्याचं चित्र दिसत आहे. काही प्रेक्षकांनी सिनेमाची तयारी घाईघाईत झाल्याचंही सांगितलं आहे.