डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ‘स्वरप्रभात-जीवनसंगीत‘ कार्यक्रमाचे आयोजन
इचलकरंजी (प्रतिनिधी) : डीकेटीईच्या राजवाडयामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त ‘स्वरप्रभात-जीवनसंगीत‘ हा खास मराठी गीतांचा कार्यक्रम गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी पहाटे ४.३० वा डीकेटीईच्या राजवाडयामध्ये आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम डीकेटीई, आपटे वाचन मंदीर व पं.बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर होणार आहे.

तरी याचा लाभ संगीत श्रोत्यांनी घ्यावा व सदर कार्यक्रमास येताना पारंपरिक पोषाखात उपस्थित रहावे असे अवाहन संयोजकांनी केले आहे.




