तांदुळवाडीतील युवा कॉन्ट्रॅक्टरच्या कुटुंबीयांची आ. सतेज पाटलांनी घेतली भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी कामाचे बिल न मिळाल्याने आत्महत्या केली होती. काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी हर्षलला न्याय मिळवून देण्याचा शब्द आमदार सतेज पाटील यांनी कुटुंबाला दिला.