देशभरात नवीन जीएसटी दर लागू ; संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल
मुंबई - आजपासून देशात नवीन जीएसटी दर लागू झाले असून, आता फक्त दोनच टॅक्स स्लॅब - 5% आणि 18% - अस्तित्वात असतील. केंद्र सरकारने या निर्णयाचे स्वागत केले असले तरी, विरोधकांनी या बदलावर टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, या जीएसटी सवलतीचा एकूण अंदाजे दोन लाख कोटी रुपयांचा भार आहे. यातून 140 कोटी नागरिकांना वर्षाला केवळ 1213 रुपये आणि महिन्याला अवघे 110-120 रुपये लाभ मिळणार आहे. आम्हालाही अर्थशास्त्र कळतं. हे सगळं खोटेपणाचं आणि फसवणुकीचं राजकारण आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला आमचे 15 लाख रुपये दिले असते, तर ते अधिक उपयुक्त ठरले असते. हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (रविवार) संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित केले. यावरही राऊतांनी टीका करत, एरवी पंतप्रधान 8 वाजता भाषण देतात, काल मात्र 5 वाजता का बोलले? कारण संध्याकाळी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होता. अंधभक्त आणि भाजपा समर्थक वेळेवर मॅच पाहू शकावीत यासाठीच ही वेळ निवडली गेली. जय शाह स्वतः काल मुंबईत होते, ही माझी माहिती आहे, असा आरोप त्यांनी केला.
भारत-पाकिस्तान सामन्यातील एका प्रसंगावरूनही राऊतांनी संताप व्यक्त केला. “सामन्यात साहिबजादा फरहान या पाकिस्तानी खेळाडूने अर्धशतक केल्यानंतर जी अतिरेकी हिंसेची शैलीत बॅट उचलून गोळ्या झाडण्याची कृती केली, ती गंभीर आहे. हे प्रतीकात्मक नसून पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांवर केलेल्या हल्ल्याचे समर्थन होते. आणि भारतीय संघ, जय शाह हे सर्व शांत बसून ते पाहत होते,” असा आरोप त्यांनी केला.
मागच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कॅप्टनशी हस्तांदोलन केलं नव्हतं. काल मात्र अशा कृतीनंतर सूर्यकुमार यादवने त्या खेळाडूला मैदानातच चपराक मारायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रिया राऊतांनी दिली.




