देहूनगरी सज्ज! ७ जुलैला तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान ; छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते होणार पादुका पूजन
पुणे : 'ज्ञानबा-तुकाराम' च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. उद्या, म्हणजेच ७ जुलै रोजी दुपारी ठीक अडीच वाजता देहू येथून या सोहळ्याचे विधिवत प्रस्थान होईल. यंदाच्या पालखी सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तब्बल २६० किलो चांदीचा वापर करून तयार करण्यात आलेला भव्य आणि नयनरम्य रथ!





