पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या ग्रामपंचायतीना गौरविण्यात येणार - मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या ग्रामपंचायतीना गौरविण्यात येणार - मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.

कोल्हापूर (प्रतिनिधी) - पंचगंगा प्रदूषण मुक्ती व जिल्ह्यातील जलस्त्रोत प्रदूषण मुक्त ठेवण्याच्या दृष्टिकोनातून 2015 पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविला जातो आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या ग्रामपंचायतीना गौरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.  यांनी दिली.

या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपला सहभाग नोंदवून या उपक्रमाला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. यावर्षी जिल्ह्यातील दोन लाख 91 हजार गणेश मूर्ती या जलस्तोत्रांमध्ये विसर्जित न करता पर्यायी व्यवस्थेत विसर्जित करून जलस्त्रोत प्रदूषित होण्यापासून थांबविले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील 54 ग्रामपंचायतीने एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून तसेच जिल्ह्यातील 13 गावांमध्ये मातीचे गणपती बसविण्याची परंपरा कायम राखत आपला पर्यावरणीय दृष्टिकोन जपला आहे. यासाठी या दोन्ही उपक्रमांमध्ये सहभागी असणाऱ्या गावांचा गौरव केला जाणार असल्याचंही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.