महानगरपालिकेच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
कोल्हापूर (प्रतिनिधी) - महानगरपालिकेच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या आदेशाने महानगरपालिकेच्या स्थायी सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन अति.आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे यांच्या उपस्थित दीपप्रज्वलन करण्यात आले.

या शिबिरात स्त्री रोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ जनरल फिजिशियन यांचे मार्फत मोफत तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक त्या रक्ताच्या तपासणी व औषधोपचार करण्यात आले. RNTCP विभागाकडून संशयित रुग्णांचे एक्स-रे व स्पूटम तपासणी करण्यात आली. यावेळी १२ रुग्णांचे Pap smear करण्यात आले तर डॉ. अग्रवाल क्लिनिक यांचे कडून नेत्र तपासणी करण्यात आली. डॉ. किरण भिंगार्डे यांनी अधिकारी व कर्मचारी यांना आपत्कालीन परिस्थितीतील प्रशिक्षण दिले. सदर कार्यक्रमात ६७ पुरुष १३५ स्त्रि असे एकूण २०२ अधिकारी व कर्मचा-यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३८ लोकांचे आभा कार्ड व ५९ लोकांचे गोल्डन कार्ड काढण्यात आले.
या शिबिरास आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, नोडल ऑफिसर डॉ. अमोल कुमार माने यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पंचगंगा रुग्णालय प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या काळे हेरवाडे यांनी केले. सदर शिबिरास महानगरपालिकेतील नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर व आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्राकडील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.




