मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का; 'या' महिला नेत्यानं केला जय महाराष्ट्र

मुंबईत ठाकरे गटाला मोठा  धक्का; 'या' महिला नेत्यानं केला जय महाराष्ट्र

मुंबई : मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सर्व पदांचा राजीनामा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. 

कोण आहेत तेजस्वी घोसाळकर ?

तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध खूप चांगले आहेत. पण स्थानिक पातळीवरच्या काही नेत्यांवर त्या नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. तेजस्वी या शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. तसेच, ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत. त्या आता भाजप किंवा शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे, असं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी यांनी आपला राजीनामा व्हॉट्सॲपद्वारे विभागप्रमुखांकडे पाठवला आहे. शिवसेनेचे मोठे नेते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

का दिला राजीनामा ?

स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून राजीनामा दिल्याचं तेजस्वी यांनी  सांगितलं. त्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून, तर काही काळापूर्वी हत्या झालेले ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत.

तेजस्वी यांना जीवे मारण्याची धमकी 

गेल्या महिन्यात तेजस्वी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. एका व्हॉट्सॲप ग्रुपवर त्यांना धमकीचा मेसेज आला होता. "लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद", असा तो मेसेज होता. याचा अर्थ, "लालचंद, याला बघून सुधार, त्याच्या बायकोला मारू नको."

तेजस्वी घोसाळकर यांच्या राजीनाम्यामुळे उत्तर मुंबईतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. शिवसेना UBT साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता यानंतर काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.