वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई विरुद्धच्या आयपीएल सामन्यात, राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीने जगातील अव्वल गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. यावेळी काॅमेंट्री करत असलेल्या हरभजन सिंगने वैभवची प्रतिक्रिया पाहून तिथंच जागेवर उभं राहत वैभवला धैर्याला सॅल्युट केला. मात्र, बुमराहला पहिल्याच चेंडूंवर सिक्स मारलेल्या वैभवने मी घाबरलो होतो, पण खेळण्याचा प्रयत्न करत होतो, अशी प्रांजळ प्रतिक्रिया दिली.

वैभवने सांगितले की, "मी गोलंदाजाकडे न पाहता फक्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होतो." "समोर इतका महान गोलंदाज असताना, मी नक्कीच घाबरलो होतो, पण मी खेळण्याचा प्रयत्न करत होतो, त्यामुळे मी बुमराहऐवजी चेंडूकडे पाहिले." बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण असेल. यशस्वी जैस्वालने मला फटकेबाजी करत राहण्यास सांगितले. हरभजन सिंगने त्याच्या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक केले. वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि ट्रेंट बोल्ट यांच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारले आहेत. तथापि, त्याला ट्रेंट बोल्टविरुद्ध मारलेला षटकार अधिक आवडला.
वैभवच्या स्फोटक खेळीचे सर्वत्र कौतुक झाले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने वैभव सूर्यवंशीची भेट घेऊन त्याचे कौतुक केले. हार्दिकने वैभवच्या छातीवर थाप मारून त्याचे अभिनंदन केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्यानंतर तो म्हणाला, "16 किंवा 17 वर्षांच्या मुलाला इतक्या निर्भयपणे खेळताना पाहणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. वैभव सूर्यवंशीसाठी आमच्याकडे कोणतीही विशिष्ट योजना नव्हती. तो पूर्णपणे अभ्यासक्रमाबाहेरचा खेळाडू ठरला आणि त्याने एक उत्कृष्ट खेळ केला."
वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराहच्या षटकात दोन षटकार ठोकले. त्याने पहिल्याच चेंडूवर लाँग-ऑनच्या दिशेने एक शानदार षटकार मारला. त्यानंतर त्याने एका शॉर्ट बॉलवर पुल शॉट खेळून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार ठोकला. त्याने शार्दुल ठाकूर आणि ट्रेंट बोल्ट यांच्याही पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकले. वैभव सूर्यवंशीने 14 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या. वैभवच्या खेळीत पाच षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.




