शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये २७ ते २९ जुलै रोजी न्यूरोलॉजिकल अवेयरनेस शिबिर

शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये २७ ते २९ जुलै रोजी न्यूरोलॉजिकल अवेयरनेस शिबिर

यड्राव (प्रतिनिधी) : मेंदू, मज्जासंस्था आणि स्नायूंच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि प्रोहॅब अॅडव्हान्स्ड फिजिओथेरपी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने 'न्यूरोलॉजिकल अवेयरनेस शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. २७ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, यड्राव येथे होणार आहे.

शिबिरामध्ये मोफत न्यूरोलॉजिकल जनजागृती, स्ट्रोक रिस्क असेसमेंट, आयुर्वेद तज्ज्ञांचे मार्गदर्शन, फिजिओथेरपी मूल्यमापन, वैयक्तिक उपचार योजना, आहार व जीवनशैलीविषयक सल्ला तसेच योग्य उपचारांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय लॅमर नॅचरल्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने मोफत हाडांची घनता (Bone Density) तपासणी करण्यात येणार आहे.

हे शिबिर विशेषतः पक्षाघातग्रस्त रुग्ण, पार्किन्सन आजाराचे रुग्ण, मान-पाठ किंवा कंबरदुखीचा त्रास असलेले, सायटिका, हात-पाय सुन्न पडणे, मधुमेहामुळे नसांचे विकार, संगणकावर दीर्घकाळ काम करणारे तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.शिबिरात स्पायनल विकार, मस्क्युलोस्केलेटल आजार, सांधेदुखी, पार्किन्सोनिझम, पेरिफेरल न्यूरोपॅथी, बेल्स पाल्सी तसेच इतर मज्जासंस्थेशी संबंधित आजारांवर विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.

रुग्णांसाठी अभ्यंग, शिरोधारा, नस्य, बाष्पस्वेदन, पत्र पोटली स्वेदन, पिंड स्वेदन, बस्ती, कटी बस्ती, ग्रीवा बस्ती, जानू बस्ती, शिरोधस्ती, मात्रा बस्ती आणि आवश्यकतेनुसार पिच्छिल अशा पंचकर्म उपचारांसह फिजिओथेरपीद्वारे वेदना व्यवस्थापन, न्यूरोलॉजिकल व ऑर्थोपेडिक रिहॅबिलिटेशन, पोश्चर करेक्शन आणि खेळाडूंना दुखापत प्रतिबंधक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या शिबिरासाठी नोंदणी शुल्क ५० रुपये ठेवण्यात आले असून, त्यामध्ये पंचकर्म व फिजिओथेरपी उपचार तसेच ईसीजी व हाडांच्या घनता तपासणीवर माफक दरात सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.या शिबिरात डॉ. वैभव माने (एम.डी. कायचिकित्सा), डॉ. माधुरी रोडे (एम.डी. पंचकर्म), डॉ. जुनेद मुझावर (एमपीटी – स्पोर्ट्स सायन्स) आणि डॉ. स्नेहल इंद्राक्षी (एम.डी. स्वास्थ्यवृत्त व योगतज्ज्ञ) हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमासाठी चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे आणि यांचे मार्गदर्शन लाभले आहे.