सैफचे कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात ; सुरक्षारक्षकाकडून मोठा खुलासा...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्यावर सहा वार करण्यात आले. पण सैफच्या घराला इतकी सुरक्षा असताना ती व्यक्ति घरात घुसलीच कशी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सुरक्षारक्षकांमधील कोणी यामध्ये सामील नाही ना असे तर्क वितर्क लढवले जात आहेत.
सैफच्या घराची निगराणी आणि सुरक्षा, सुरक्षारक्षक दोन शिफ्टमध्ये करतात. सैफ आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतो. याकरिता, इमारतीच्या रक्षकांव्यतिरिक्त त्यांनी वैयक्तिक रक्षकही नेमले आहेत. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आता गार्डचे पहिले वक्तव्य प्रसारमाध्यमांसमोर आले आहे. ही घटना ज्यावेळी घडली तेव्हा तो झोपला होता, असे सुरक्षा रक्षकाचे म्हणणे आहे.
सैफ अली खानच्या घराच्या इमारतीखाली ३ सुरक्षारक्षक तैनात होते. सैफवरील हल्ल्यानंतर त्यांची चौकशी केली असता, एका गार्डने "माझी सकाळची शिफ्ट होती आणि त्यावेळी मी झोपलो होतो", असे वक्तव्य केले. नाईट शिफ्ट कर्मचाऱ्यांची तपासणी करा. सैफ-करीनाच्या इमारतीखाली दोन शिफ्टमध्ये गार्ड ड्युटी करतात. एकावेळी ३ ते ४ रक्षक हजर असतात. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला, त्यामुळे रात्रपाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात
पोलिसांनी सैफ अली खानच्या इमारतीतील रक्षक आणि कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस सर्वांची कसून चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीवरुन, जेव्हा अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला तेव्हा त्याला सैफच्या मोलकरणीने पकडले. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा आवाज सैफच्या कानापर्यंत पोहोचताच तो लगेच तीथे पोहोचला. एक अज्ञात व्यक्ती त्याच्या मोलकरणीशी वाद घालत असल्याचे सैफने त्यावेळी पाहिले.