स्पर्धा परीक्षा फेलोशिप सी.ई.टी अभ्यासक्रम मार्गदर्शन शिबिर संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - समाजातील दीन,दलित,गरीब होतकरू विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्यापासून वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बार्टी, सारथी,आर्टी, महाज्योती, टीआरटीआय संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा करीता फेलोशिप सी.ई.टी अभ्यासक्रम मार्गदर्शन शिबिर प्राचार्य प्रा. (डॉ.) दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. घाळी महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
यू.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., आय.बी.पी.एस.,व पोलिस भरती आणि सरळसेवा भरती करीता महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध संस्थामार्फत राबविण्यात येणारे विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी अभ्यासक्रम व 50 हजार ते 1 लाख 71 हजार रुपयाची फेलोशिप घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी कसे व्हावे यासंदर्भात मार्गदर्शन प्रा.व्ही.पी प्रधान सर यांनी तर सी.ई.टी अभ्यासक्रम संदर्भात प्रा. आर. डी. वारके सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक प्रा. आर.एस.सावेकर स्पर्धा परीक्षा समन्वयक यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. (डॉ.) एन.बी.मासाळ होते. सदरचे प्रशिक्षण शिबिर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक युगात किती महत्वाचे आहे, याबाबत बी. ए. भाग एक ची विद्यार्थी कु. साधना शेरकर हिने विद्यार्थी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. (डॉ.) एस एस संघराज,विभाग प्रमुख राज्यशास्त्र, प्रा. डी. एन. महाडिक, प्रा. एस पी कांबळे, प्रा. डॉ एस् . बी. परीट, प्रा.वंदना खोराटे मॅडम, प्रा. मोरस्कर आदींसह महाविद्यालयातील विविध शाखामधील 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.